चिकन बिर्याणीमध्ये जास्त मीठ असल्याचं म्हणत दोन मुलांनी हॉटेल कर्मचाऱ्यावर हल्ला केला. बिर्याणीचे पैसे द्यायचे नसल्याने या मुलांनी बहाणा केला आणि वाद घातला असा आरोप करण्यात आला आहे. आरोपी हे अनुक्रमे 14 आणि 15 वर्षांचे आहे. बिर्याणी खाऊन झाल्यानंतर त्याचे पैसे मागितल्यावर बिर्याणीत मीठ जास्त होतं, ती बेचव होती असं म्हणत आरोपींनी वाद घातला. यानंतर त्यांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यावर हल्ला केला अशी पोलिसांत तक्रार दिली आहे. नवी दिल्लीत ही घटना घडली आहे.