मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील धोकादायक अवस्थेमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वर्षा बंगल्याकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी असलेले मोठे मॅनहोल खचल्याने येथे मोठा खड्डा निर्माण झाला आहे. या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून लावण्यात आलेले बॅरिकेड्सही तुटल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही परिस्थिती अनेक दिवसांपासून कायम असून अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गाची ही अवस्था असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Large pothole on the road leading to CM Devendra Fadnavis's bungalow installed barricades also broken