Global News| अमेरिकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का, H-1B visa चे शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव

अमेरिकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांना धक्का बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने काही विशिष्ट एच-1बी व्हिसा अर्जांच्या शुल्कात प्रचंड वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हे शुल्क वाढवून आता तब्बल 103265 डॉलर करण्याचा हा नवा प्रस्ताव आहे. भारतीय रुपयांत ही रक्कम जवळपास 98 लाखांपेक्षा जास्त होते. ट्रम्प सरकारने गेल्या वर्षी लागू केलेले 1,00,000 डॉलरचे शुल्क आता कायमस्वरूपी करता यावे यासाठी नियम बनवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रस्तावाबद्दलच्या हरकती, सूचनांसाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. 8 जून 2026 रोजी अमेरिकेच्या न्यायालयाने एक स्थगिती आदेश दिला होता. या आदेशाद्वारे 1 लाख डॉलरच्या शुल्कआकारणीस स्थगिती मिळाली होती. मात्र अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने या निर्णयाला वरच्या न्यायालयात आव्हान दिले आहे. Setback for those dreaming of jobs in the US Proposal to hike H-1B visa fees.

संबंधित व्हिडीओ