शिंदेंच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची आज दमदार सुरूवात झाली.उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा कोकणातील एक बडा शिलेदार आज शिंदेंकडे गेला.नाव आहे राजन साळवी.राजन साळवींच्या जाण्याने कोकणात शिवसेना रुजवणारं आणखी एक नाव ठाकरेंच्या यादीतून कटअप झालंय.साळवींना शिवसेनेत घेण्यासाठी सामंत बंधूंचा चांगलाच विरोध होता.पण शिंदेंनी एकाच बैठकीत तो विरोध विझवला आणि थेट आनंद आश्रमात साळवींचा पक्षप्रवेश झाला.या पक्षप्रवेशामुळे ठाकरेंचा कोकणातला बुरूज तर ढासळलाच पण पक्षातील उदासीनतेत आणखी भर पडलीय.