शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्कार देण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सातत्याने टीका केली जातेय.संजय राऊत यांनी शरद पवारांनी शिंदेंचा असा सन्मान करणं दुर्देवी आहे असल्याचं म्हटलंय. याच वक्तव्याचा जितेंद्र आव्हाड यांनी समचार घेतलाय.'विधानसभेचं अधिवेशन सुरु असताना आम्ही सर्व विरोधी पक्षाचे नेते एकत्र बसलो होतो. आमच्या समोर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले. तेव्हा लोकांनी मला विचारलं हे कसं काय? तेव्हा मी भेटायलाच पाहिजे. त्यावेळी आम्ही काही बोललो का असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केलाय.