शिंदेंच्या शिवसेनेच्या स्नेहभोजनाला जाण्यास आदित्य ठाकरेंनी सर्व खासदारांना मनाई केली. कुठल्याही स्नेहभोजनाला जाणार असाल तर पक्षाची परवानगी घ्या असे आदेश आज दिल्लीत आदित्य ठाकरेंनी दिले.आदित्य ठाकरेंच्या आदेशावर खासदारांनी नाराजी व्यक्त केली.आदित्य ठाकरेंच्या आदेशावर खासदार संजय जाधव यांनी मोठे वक्तव्य केलंय.शिंदे शिवसेनेचे प्रतापराव जाधव जुने सहकारी आहेत.त्यांच्याकडे स्नेहभोजनाला जाण्यासाठी पक्षाच्या परवानगीची गरज नाही.असं संजय जाधव म्हणाले.त्यामुळे खासदारांच्या स्नेहभोजनावरुन रंगलेलं राजकारण आता खरंच खासदारांच्या नाराजीचं कारण ठरतंय का हे पाहावं लागेल.