दिल्लीत सध्या स्नेहभोजनांचा मौसम आहे.खरं तर आपसातले राजकीय मतभेद विसरुन महाराष्ट्राची संस्कृती जपत सर्वपक्षीय नेते स्नेहभोजनाला जातात, गप्पा मारतात. धकाधकीच्या राजकारणातून थोडे विसाव्याचे क्षण अनुभवतात.मात्र या स्नेहभोजनांमुळेच दिल्लीतलं वातावरण तापलंय.शिंदेंच्या मत्र्यांकडे ठाकरेंचे खासदार स्नेहभोजनाला गेले.मात्र या स्नेहभोजनाचं राजकीय टायमिंग पाहिलं तर ऑपरेशन टायगरच्या चर्चेला बळ मिळतंय.