राजन साळवींनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर विनायक राऊतांवर हल्लाबोल केलाय. विनायक राऊत आणि सामंत बंधूंची मिलीभगत असल्याचा गंभीरआरोप त्यांनी केलाय.लोकसभा निवडणुकीत सामंत बंधूंनी विनायक राऊतांना मदत करूनही ते हरले, असं म्हणत राजन साळवींनी राऊतांवर निशाणा साधलाय.