मंत्री नितेश राणे यांनी एक वादग्रस्त विधान केलंय. 'मविआचे सरपंच असलेल्या गावात निधी देणार नाही, त्यामुळे गावाचा विकास करायचा असेल तर भाजपत प्रवेश करा',अशा शब्दांत राणेंनी मविआच्या सरपंचांना इशारा दिलाय. कुडाळमध्ये पार पडलेल्या भाजप मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलंय. दरम्यान नितेश राणेंच्या या विधानाचा जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतलाय.. निधी तुमच्या घरून येत नाही, अशा शब्दात आव्हाडांनी राणेंना सुनावलंय..