मुंबईत सांस्कृतिक वैभव म्हणून जी ठिकाणं ओळखली जातात त्यातलं सगळ्यात जुनं ठिकाण म्हणजे फोर्ट परिसरामधलं रंगभवन.रंगभवन हे खुलं नाट्यगृह दिग्गजांच्या अनेक मैफिलींची ही वास्तू साक्षीदार ठरलीय.शास्त्रीय संगीतासह महाराष्ट्र सरकारचा वार्षिक मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा, लावणी महोत्सव असे अनेक कार्यक्रम रंगभवनमध्ये व्हायचे.मात्र उच्च न्यायालयानं हा परिसर सायलेंट झोन घोषित केला आणि रंगभवनची रयाच गेली.आज रंगभवन भग्नावस्थेत आहे.कोर्टाचे नियम पाळूनही रंगभवनला त्याचं गतवैभव मिळवून देणं सहज शक्य आहे.मराठी भाषा दिन पुढच्या काही दिवसांतच येतोय.यानिमित्तानं रंगभवनलाही न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे.पाहुय यासंदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट....