अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे…एक अशी दुर्घटना, ज्याने देश हादरला होता आणि अनेक कुटुंबांचं आयुष्य क्षणार्धात बदलून टाकलं होतं. या दुर्घटनेत अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. त्या काळात बचावकार्य, प्रशासनाची धावपळ आणि नातेवाईकांचा आक्रोश हे सगळं दृश्य आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर ताजं आहे.या घटनेनंतर विमान सुरक्षा, तांत्रिक तपासणी आणि एव्हिएशन क्षेत्रातील नियमांवरही मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या.