Bhiwandi मध्ये FDA अधिकारी बनून तोतया टोळीकडून व्यापाऱ्यांची लूट; तोतया महिला पोलिसांच्या ताब्यात

सध्या अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची धडकी अनेकांनी घेतली असताना याच संधीचा फायदा घेत तोतया महिलांच्या टोळीने भिवंडीत पैसे उकळलेत. भिवंडीत मागील पंधरा दिवसात शांतीनगर हॉटेल व घाऊक विक्रेत्यांना आपले लक्ष बनवित त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरवात केलीय. अशाच एका टोळीतील महिलेला सतर्क नागरिकांमुळे पकडण्यात यश आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शांतीनगर सागर प्लाझा हॉटेल परिसरातील एका घाऊक दुकानात तीन महिला व एक पुरुष हे आपण एफडीएचे अधिकारी असल्याचे सांगून धमकावून पैशांची मागणी करीत असल्याची माहिती मिळाली.त्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी रवाना झाले परंतु तत्पूर्वी तेथून दोन महिला व एक पुरुष घटनास्थळावरून पसार झाले होते.

संबंधित व्हिडीओ