मुंबईतील गिरगाव चौपाटी परिसरात प्रशासनाच्या निर्णयाविरोधात कोळी बांधव आक्रमक झाले आहेत. गिरगावमधील समृद्ध परंपरा जपणाऱ्या कोळी समाजाच्या बोटी हटवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.या निर्णयाला कोळी बांधवांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात येत असून, “आम्ही इथून जाणार कुठे?” असा थेट सवाल ते उपस्थित करत आहेत. वर्षानुवर्षे या परिसरात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांनी आपला हक्क आणि उपजीविकेचा प्रश्न पुढे आणत आंदोलनाची भूमिका घेतली आहे.