बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या टाकळी इथल्या विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक अर्थात SIT ची स्थापना करण्यात आलीय. हे तपास पथक IPS अधिकारी वेंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली काम करणार आहे. घटना गंभीर स्वरूपाची असल्यामुळे तपास SIT कडे वर्ग करून चौकशीला सुरुवात करण्यात आलीय. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत सर्व 9 आरोपींना अटक करण्यात आलीय. तसंच, पुरवणी जबाबामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव समोर आलं असून,या अँगलनेही तपास सुरू असल्याची माहिती मिळते आहे.दरम्यान या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण सौरभ सोनावणे याने दिलंय. तर बजरंग सोनावणेंनीही प्रतिक्रिया दिलीय पाहुयात.