शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत लोकसभा अध्यक्षांच्या भेटीसाठी संसदभवनात पोहोचलेत. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे ठाकरे गटाने भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यानुसार ही बैठक होतेय.