संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे मुसळधार पावसात पंढरपूरकडे प्रस्थान, पालखी सोहळ्यातून वारकऱ्यांशी संवाद

वारकरी संप्रदायाचे मातृपीठ असलेल्या आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे.संत मुक्ताईंच्या पालखीच्या प्रस्थान दिनीच वरुणराजाने मुसळधार हजेरी लावल्यामुळे शेतकरी आणि वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलंय.विठू नामाचा गजर करत, हातात टाळ-मृदंग घेऊन हजारो माळकरी, टाळकरी आणि संत या वारीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले संत व महिला वारकरी यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी..

संबंधित व्हिडीओ