शिर्डी शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्नभेसळ प्रतिबंधक पथकाने मोठी कारवाई केलीये.पथकाने पेढे उत्पादन करणाऱ्या फॅक्टरी आणि पेढे विक्रीच्या दुकानांवर धाड टाकली.या कारवाईत संशयित व निकृष्ट दर्जाचे हजारो किलो पेढे जप्त करण्यात आलेत.तसेच काही पॅकबंद उत्पादनांवर कायदेशीर मापनशास्त्र अधिनियम 2009 आणि पॅकेजबंद वस्तू नियम 2011 अंतर्गत आवश्यक माहिती नसल्याचे आढळून आलंय.. जप्त केलेल्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी सुरू असून अहवालानंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या धाडसत्रामुळे शिर्डीतील पेढे व्यावसायिकांमध्ये खळबळ असून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनिल दवंगे यांनी.