सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात स्मारकाच्या कामावरून तणावाची परिस्थिती निर्माण झालीय. स्मारकाचं काम संथ गतीने सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आक्रमक झाले असून, स्मारक समितीतील पदाधिकारी शरणू हांडे यांनी थेट कुलगुरूंच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांच्या अंगावर भंडारा उधळत निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर संबंधित ठेकेदारावर पाण्याची बाटली फेकून मारल्याचा प्रकारही या बैठकीदरम्यान घडलाय. कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या समोरच काळे झेंडे दाखवत आंदोलनही करण्यात आलं. मात्र या संपूर्ण घटनेवर कुलगुरूंनी भाष्य टाळलं. आता या प्रकरणात दोषींवर विद्यापीठ प्रशासन काय कारवाई करतं, याकडे लक्ष लागलं आहे.