Ahilyanagar Rain| अकोलेत मुसळधार पावसाचा कहर; गोगदरीचा पूल तुटला, वाहतूक ठप्प

अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता ग्रामीण भागाला बसला आहे.विशेषतः अकोले तालुक्यात अतिवृष्टीमुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत.भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या विक्रमी पावसामुळे अकोले तालुक्यातील मवेशी गावाजवळील गोगदरीचा पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे तुटला आहे.त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून ग्रामस्थांचा संपर्क विस्कळीत झाला आहे.पुलाचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ