PM Modi यांनी सांगितलेल्या तीन मोठ्या गोष्टी कोणत्या? पेपरफुटीसंदर्भातल्या नव्या विधेयकात काय?

पेपरफुटीप्रकरणी कठोर कारवाई करणार असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्री स्वतःचा व्हिडीओ ट्वीट केला.. तसंच पेपर फुटीवर कठोर कायदा आणला जाणार असल्याचं आश्वासनही पंतप्रधानांनी या व्हिडीओतून दिलं. त्यानुसार संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेपरफुटीबाबतच्या कायद्याला मंजुरी देण्यात आली असून लवकरच हा प्रस्तावित कायदा संसदेत मांडला जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी सांगितल्याप्रमाणे पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर आता कठोर कारवाई होणार आहे. त्यासाठी पेपरफुटी प्रतिबंध कायद्यात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलीय. या नव्या तरतुदींनुसार दोषींना 10 वर्षांपर्यंत शिक्षेची आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ