पालघर जिल्ह्यातील तीन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर आता पाणी ओसरू लागलं आहे, मात्र पूरग्रस्तांच्या अडचणी कायम आहेत.डहाणू तालुक्यातील चिंचणी आणि खाडी परिसराची जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.प्रत्येक बाधित कुटुंबाला 5 हजार रुपयांची आर्थिक मदत, अन्नधान्य आणि ग्रामपंचायतीमार्फत फूड किट देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.वारंवार पाणी शिरणाऱ्या भागांमध्ये कायमस्वरूपी उपाययोजना करू असे आश्वासनही त्यांनी दिले.आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे 2 हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर आणि बचावकार्य करण्यात आले आहे.