नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.नांदूरमधमेश्वर धरणातून तब्बल 94 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला महापूर आला आहे.धरणाखालील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून निफाड–सिन्नर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदीपात्र, पूल व पुरग्रस्त भागात न जाण्याचे आवाहन केले आहे.या पुलाजवळून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी...