पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे डहाणू तालुक्यातील वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणारा डहाणू–बोर्डी–झाई–उंबरगाव या महत्त्वाच्या राज्य मार्गावर नरपडजवळ दोन ठिकाणी तब्बल ६० मीटर रस्ता वाहून गेल्याने बोर्डी, घोलवड, चिखलासह अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले असून, उद्यापर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच महामार्गाच्या दुरुस्ती बाबत पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी.