दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उमटत असताना जळगाव पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सायबर पेट्रोलिंग अधिक तीव्र केले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून अजाणतेपणाने कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल असे कोणतेही कृत्य घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. यासाठी सायबर पोलिसांचे दहा कर्मचाऱ्यांचे विशेष पथक फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर), यूट्यूबसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्ट, व्हिडिओ आणि संदेशांवर 24 तास लक्ष ठेवून आहे.