नागपुरात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं... घोषणाबाजी सुरू होती... पोलिसांसोबत चर्चाही सुरू होती... आणि वातावरण चांगलंच तापलेलं होतं. पण अचानक असं काही घडलं की आंदोलनकर्ते, पोलीस अधिकारी आणि उपस्थित सगळेच काही क्षणांसाठी स्तब्ध झाले...चर्चेच्या मध्यातच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी थेट 'जन गण मन' गायला सुरुवात केली.