राष्ट्रीय परीक्षा एजन्सी अर्थात NTA मध्ये मोठ्या बदलांची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील एका महिन्यात NTA ची आमूलाग्र पुनर्रचना केली जाणार आहे. पेपरफुटी आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी लीक-प्रूफ व्यवस्था उभारण्याबरोबरच, आउटसोर्सिंगच्या सध्याच्या पद्धतीतही बदल केले जाणार आहेत. तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार हे बदल करण्यात येणार असून, NTA मधील 47 जणांना हटवण्याची आणि काहींवर कारवाई करण्याची तयारीही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.