Akola मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या घराची 10 तास झडती, दीड कोटींची रोकड, अर्धा किलो सोनं जप्त

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकलेले अकोल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगाव येथील निवासस्थानी ACB ने घेतलेल्या झडतीत तब्बल एक कोटी 53 लाख 630 रुपयांची रोकड, अर्धा किलो सोने आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अकोल्यातील कारवाईनंतर किरण चौधरी यांचे जळगाव येथील घर सीलबंद करण्यात आले होते. दरम्यान, याच सीलबंद घरात काही दिवसांपूर्वी मध्यरात्री घुसलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी रंगेहाथ अटक करून गुन्हा दाखल केला होता.

संबंधित व्हिडीओ