रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडलीये.. त्यामुळे खेडमधील मटण मार्केट परिसरात जगबुडी नदीच्या पुराचं पाणी शिरलंय.. खेड नगर परिषद प्रशासन आणि तालुका आपत्ती विभागाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्यात.. सध्या खेडमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे..