सिंधुदूर्गच्या देवगड येथे आंबा, काजू बागायतदार आणि व्यापारीसंघ एकवटल्याचं पाहायला मिळतंय... अणुऊर्जा प्रकल्पाला ठाम विरोध करत अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघर्ष समितीने जलसमाधी आंदोलन करण्यात आलं.. तर मिठमुंबरी येथे कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय... मात्र आंबा बागायदारांनी पाण्यात उतरत जल समाधी आंदोलन करण्यात आलं.दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत अणुऊर्जा कोकणात होऊ देणार नाही.. बागायतदारांना जी मदत जाहिर केली ती तुटपुंजी आहे. ती आम्ही स्वीकारणार नाही..अशी भूमिका शेतकरी नेते राजू शेट्टींनी घेतलीय.