नाशिकच्या मालेगावमध्ये कलेक्टर पट्टा भागात घराचा स्लॅब कोसळून 80 वर्षीय आजी आणि 20 वर्षीय नातवाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली.विमलबाई पंढरीनाथ येवले आणि चेतन रामचंद्र येवले असे ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झालेल्या आजी , नातवाचे नाव आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.