आता आम्ही जे दाखवणार आहोत, ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.तुम्ही घरातून निघण्याआधी हे पाहा आणि मगच घराबाहेर पडा. माझ्या पाठी तुम्हाला दिसतायत ती उघडी मॅनहोल्स आणि उघडी गटारं हे सगळे फोटो प्रातिनिधीक किंवा आम्ही इंटरनेटवरुन घेतलेले नाहीत.तर हे सगळे फोटो तुमच्या शहरांमधल्या उघड्या मॅनहोल्सचे आणि उघड्या गटारांचे आहेत. आज आम्ही तुम्हाला तुमच्या शहरांमध्ये कुठे कुठे उघडे मॅनहोल आहेत, ते दाखवतोय. तुमच्या शहरातल्या महापालिका ढिम्म आहेतच.याच महापालिकांच्या बेफिकिरीमुळे ठिकठिकाणी अक्षरशः मृत्यूचे सापळे लावले गेलेत.पण तुम्ही चालताना जपून पावलं टाका.सध्या जोरात पाऊस आहे.पावसात पाणी भरलं तर ही उघडी गटारं आणि मॅनहोल्स तुम्हाला दिसणारसुद्धा नाहीत.कुणाचाही पाय घसरू नये. कुणीही या उघड्या मॅनहोल्समध्ये पडू नये.म्हणून तुमच्या सुरक्षेसाठी.तुमच्या सावधगिरीसाठी आम्ही तुम्हाला ही तुमच्या गावातली, शहरातली मॅनहोल्स दाखवतोय. हे पाहा... आणि मगच घराबाहेर पडून रस्त्यावर चाला.