नागपूरमध्ये पत्नीनेच पतीच्या हत्येचा कट रचल्याची घटना समोर आलीय... गुरुवारी रात्री हनुमाननगरात धारदार शस्त्रांनी निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या गणेश उर्फ गुरुदेव बोरकर प्रकरणात त्याची पत्नी मनीषाच सूत्रधार निघाली.. एक लाख रुपयांची सुपारी देऊन मनीषा हिनेच गणेश बोरकरची हत्या केल्याचं उघड झालंय.. याप्रकरणी पत्नीसह दोन आरोपींना अटक केली आहे, तर दोन आरोपी अजूनही फरार आहेत..