चंद्रपूर शहर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली. मात्र या निमित्तानं सत्ताधारी भाजपमधलेच दोन गट आमनेसामने आले.आमदार किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या गटातील नगरसेवकांमध्ये थेट धक्काबुक्कीपर्यंत सारं प्रकरण गेलं. यामुळे महानगरपालिका परिसरात काही काळ गोंधळ आणि तणावाचं वातावरण होतं.चंद्रपूर महापालिकेत अधिक जागा मिळूनही काँग्रेसमधील गटबाजीनंच सत्ता हातची गेली होती.आणि आता सत्ताधारी भाजपमधली ही गटबाजी समोर आलीय.