Satara| बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, उरूल गावचे सरपंच नितीन निकमांसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

सातारा जिल्ह्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा धक्कादायक पर्दाफाश झाला आहे. पाटण तालुक्यातील उरुल गावातील सरपंचासह पाच जणांविरुद्ध मल्हारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ५०० रुपयांच्या १७ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. चौकशीदरम्यान एका संशयिताने या बनावट नोटा उरुलचे सरपंच नितीन निकम यांच्याकडून घेतल्याचे पोलिसांना सांगितल्या नंतर पोलिसांनी नितीन निकम यांना ताब्यात घेतले आहे. नितीन निकम हे शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या प्रकरणामागे मोठे बनावट नोटांचे रॅकेट असल्याचा संशय असून त्याची पाळेमुळे शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ