आम्हाला सांडपाणी प्यायला लावू नका, सांडपाणी पुनर्वापर चाचणीसंदर्भात धारावीवासियांकडून नाराजी व्यक्त

सांडपाणी पुनर्वापर चाचणीसंदर्भात धारावीवासियांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला सांडपाणी प्यायला लावू नका अशी प्रतिक्रिया धारावीतील रहिवाशांनी केलीय. राज्यात यावर्षी कमी पर्जन्यमान असल्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी लवकरच एक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुरवठा धारावीला करण्यात येत आहे. धारावीकरांना आधीच वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.त्यामुळे धारावीकरांवर आणखी प्रयोग नको असं स्थानिक डॉक्टर आणि रहिवासी यांचं म्हणणं आहे.

संबंधित व्हिडीओ