दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर Amol Mitkari यांचं मोठं विधान, तर Supriya Sule यांचंही सूचक विधान

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलंय.'पांडूरंगाची इच्छा असली तर बहिण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात, 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा', असं सूचक वक्तव्य मिटकरींनी केलंय.. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचं सुतोवाच मिटकरींनी केलंय.. पांडूरंगाची इच्छा असली तर आषाढीपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं मिटकरींनी भाकीत केलंय.तर दुसरीकडे अजित पवार आणि मी जन्मापासून एकत्र आहोत... असं विधान सुप्रिया सुळेंनी केलंय.

संबंधित व्हिडीओ