महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील शिळांना तडे गेल्याने सपोर्टसाठी चक्क लोखंडी बार लावण्यात आले आहेत तसेच चोपदार दरवाज्यात देखील सपोर्ट साठी लोखंडी फ्रेम लावली आहे. त्यामूळे देवीच्या मुख्य गाभाऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे का?असा प्रश्न उपस्थित होत आहे. अवकाळी पावसाने मंदीरात अनेक ठिकाणी गळती लागली आहे.माञ गाभारा मध्ये कुठेही गळती लागलेली नसल्याचे सांगत पुरातत्व विभागाच्या वतीने स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर गाभाऱ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने लोखंडी बार व फ्रेम लावुन उपाययोजना केल्याची माहिती मंदीर संस्थानचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिलीय.