भाजपचे आमदार आणि राज्याचे मंत्री नितेश राणे नेहमीच वादग्रस्त विधान करून चर्चेत असतात. त्यामुळे नेहमीच त्यांच्यावर विरोधक टीका करत असतात. मात्र आता तर त्यांच्या ज्येष्ठ बंधू आमदार निलेश राणेंनी त्यांना जपून बोलायचा सल्ला दिला आहे. नितेश ने जपून बोलावे.मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे.आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही. असा मोलाचा सल्ला लहान भावाला आमदार निलेश राणेंनी दिला आहे.