Donald Trump आणि Elon musk यांच्यातील वाद शिगेला, ट्रम्प यांनी मस्क यांना काय दिला इशारा | NDTV

रिपब्लिकन पार्टीला देणग्या दिल्या तर इलोन मस्क यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असा स्पष्ट इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते NBC या अमेरिकन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मस्क आणि अमेरिकन प्रशासन यांच्यातील विद्यामान वाद विषय भाष्य करत होते. ट्रम्प यांनी दिल्यास आठवड्यात अमेरिकन नागरिकांना कर सवलत देणारे बिग ब्यूटीफुल बिल अमेरिकन काँग्रेसमध्ये म्हणजेच अमेरिकन संसदेच्या खालच्या सभागृहामध्ये मंजूर करून घेतला आहे. वरच्या सभागृहात म्हणजे सिमेंट मध्ये हे बिल मंजूर करण्यासाठी ट्रम्प याच्या पक्षाला अगदी तकलादू बहुमत आहे. याच पार्श्वभूमीवर काही रिपब्लिकन सिनेट मेंबर्स ट्रम्प यांच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता आहे. या मेंबर्सना आपल्या बाजूने वळवण्याचा मस्त प्रयत्न करीत आहेत अशी चर्चा सध्या अमेरिकेत विशेषतः अमेरिकन माध्यमांमध्ये सुरू आहे. या चर्चेला उत्तर देताना ट्रम्प यांनी मस्क्यांना गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांचे संबंध एका लहान मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीची होते असा दावा करणारे ट्विट मस्क यांनी कालच डिलीट केले आहे. त्यामुळे दोघांमधील वाद काही प्रमाणात शमल्याची चिन्ह दिसू लागलेली असतानाच ट्रम्प यांनी हा इशारा दिल्याने वाद मिटलेला नाही असे चित्र सध्या बघायला मिळत आहे.

संबंधित व्हिडीओ