Amravati | अमरावती जिल्हा परिषदेतील औषधसाठा कालबाह्य, अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई | NDTV
Expired medicine stock at Amravati Zilla Parishad; Food and Drug Administration takes action.
अमरावती जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषधी भांडारगृहातील लाखो रुपयांचा औषधसाठा कालबाह्य झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सामान्य व गरजू रुग्णांना मोफत वाटप करण्यासाठी आलेला हा औषधसाठा वेळेत वितरित न झाल्याने कालबाह्य झाला असून, जिल्हा परिषदेच्या आवारातील परिसरात अडगळीत असलेल्या खोल्यांमध्ये पडून असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते समीर जवंजाळ यांनी औषध प्रशासनाकडे करण्यात आली होती.