Nandurbar| आदिवासी विद्यार्थ्यांच्या ताटात सडलेलं अन्न, चांगल्या अन्नासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन

नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथील आदिवासी विद्यार्थी वस्तीगृहात सडलेलं अन्न दिलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार विद्यार्थ्यांनी उघडकीस आणलाय.. विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी सडलेली केळी, खराब पोहे, भेंडी आणि कांदे वापरले जात असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलाय. हे निकृष्ट अन्न खाल्ल्याने अनेक विद्यार्थी आजारी पडत असल्याचा दावा करण्यात आला असून, खराब अन्न वस्तीगृहाबाहेर काढून ठेवत प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला. या गंभीर प्रकाराची दखल घेत नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी यांनी तात्काळ चौकशी पथक पाठवून पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे. आता चौकशीत काय सत्य समोर येते आणि दोषींवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित व्हिडीओ