अमरावती शहरात एमडी ड्रग्सचा वाढता प्रभाव चिंताजनक बनला असून अनेक तरुण त्याच्या विळख्यात अडकत आहेत. यासंदर्भात खासदार बळवंत वानखडे यांनी वक्तव्य केलंय.या ड्रग्स प्रकरणात गुजरात आणि राजस्थानशी संबंधित कनेक्शन समोर येत असल्याची माहिती पुढे येत आहे. असं वानखडे म्हणालेत.या रॅकेटचा मुख्य सूत्रधार शोधण्यासाठी विशेष पथक नेमून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.खासदार बळवंत वानखडे यांनी लोकसभेत कठोर कारवाईची मागणी करत केंद्र आणि राज्य सरकारने तात्काळ पावले उचलावीत असे सांगितले.