Beed मध्ये भरधाव ट्रकची कारला धडक; कारने पेट घेतल्याने माय-लेकाचा जागीच मृत्यू | NDTV मराठी

बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावर काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली. खडीने भरलेल्या भरधाव हायवाने कारला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे कारने अचानक पेट घेतला. प्राथमिक माहितीनुसार कार मध्ये पती पत्नी असल्याचे समोर आले होते. मात्र या कारमध्ये आई आणि मुलगा प्रवास करत असल्याची पोलिस सूत्रांची माहिती आहे. अपघातात कारच्या दरवाजाचा चुराडा झाला होता त्यामुळे बाहेर पडता न आल्याने दोघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.. केज तालुक्यातील आई आणि मुलगा आपल्या कारमधून बीडच्या दिशेने जात होते. याच वेळी बीडकडून ईठाणकडे खडी घेऊन जाणाऱ्या एका भरधाव हायवाने कापशी गावाजवळ कारला समोरून जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारच्या इंजिनने तात्काळ पेट घेतला. मदत मिळण्यापूर्वीच कारला आगीने वेढा घेतला होता. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित व्हिडीओ