Nagpur मध्ये CET परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ | NDTV मराठी

नागपूरमध्ये सीईटी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आली.कंत्राटदार कंपनीच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.नागपूरच्या वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर दुपारी ३ वाजता परीक्षा नियोजित होती.मात्र, ऐनवेळी सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला.त्यामुळे आजचा पेपर पुढे ढकलण्यात आला असून, पुढील वेळ विद्यार्थ्यांना ईमेल किंवा एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे.

संबंधित व्हिडीओ