Maharashtra Rain | कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, लांजा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्म्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. दिवसभर कडक ऊन आणि घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त होते. मात्र, सायंकाळी अचानक आभाळ भरून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली.. सकाळपासून वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होत.त्यानंतर सायंकाळच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. लांजा तालुक्यातील आरगाव, व्हेळ रिंगणे, कुरंग वीलवडे आदी भागांमध्ये पावसाने हजेरी लावली.अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील आंबा बागायतदार धास्तावलेत..

संबंधित व्हिडीओ