पिंपरी-चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भपाताच्या गोळ्या घेतल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन एका २२ वर्षीय अविवाहित तरुणीचा आणि तिच्या सात महिन्यांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी तरुणीने गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या, ज्यानंतर तिची मुदतपूर्व प्रसूती झाली.प्रसूतीनंतर तरुणीला प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाल्याने तिची प्रकृती खालावली. उपचारादरम्यान काही तासांतच दोघांचाही मृत्यू झाला. तरुणीचा मोबाईल फोन फॉरमॅट केलेल्या अवस्थेत आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे. या तरुणीला गर्भपाताच्या गोळ्या कोणी पुरवल्या ? तिच्या मोबाईलमधील डेटा कोणी आणि का नष्ट केला ? यामागे कोणाचे दडपण होते का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चिंचवड पोलिसांनी तपासचक्र फिरवले आहे.