इराण आणि इस्रायल-अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धाला जवळपास 1 महीना होत आला असून आता हा संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. इराणच्या उर्जा प्रकल्पांवर आणि तेल सुविधांवर 10 दिवस हल्ले होणार नाही, अशी मुदत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. मात्र एकीकडे चर्चेचा प्रस्ताव देतानाच दुसरीकडे ट्रम्प यांनी मध्यपूर्वेत आणखी 10 हजार सैनिक पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. मध्य-पूर्वेतील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने एक मोठे लष्करी पाऊल उचलले आहे.