PM Modi यांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; इंधन पुरवठा, खताच्या साठ्याबाबत चर्चा

युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली..या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव, आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्र शासित प्रदेशांचे नायब राज्यपाल उपस्थित होते... मोदींनी 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन केलं... तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीने भूमिका मांडलीय.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यांमध्ये कोणताही घबराटीचा माहोल निर्माण होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय.. तर देशात लॉकडाऊन लागू केला जाणार नाही, अशीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

संबंधित व्हिडीओ