Turkey| तुर्कीमध्ये पुन्हा नवा वणवा, अंताल्या शहरातील निवासी इमारती रिकाम्या; आगीत 13 जणांचा मृत्यू

तुर्कीच्या भूमध्य सागराच्या किनारी भागात पुन्हा नवा वणवा पेटलाय. अंताल्या शहरातील निवासी इमारती रिकाम्या कऱण्यात आल्यात. आक्सू जिल्ह्याच्या बाहेरील भागात हे वणवे पेटलेत.किनारी प्रदेशालगत हा वणवा लागलेला असल्यानं जोरानं वाहणाऱ्या वाऱ्यांचा आग विझवण्यात अडथळा येत आहे.तुर्कीमध्ये २७ जूनपासून वणवे पेटण्यास सुरुवात झालीय. आतापर्यंत १२० परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलयं.दरम्यान गुरुवारी लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू झालाय यात अग्निशमन दलाच्या १० जवानांचा समावेश आहे.अलिकडे तापमानात झालेली प्रचंड वाढ, आणि शुष्क वाऱ्यांमुळे वणवे पेटण्याच्या घटना वाढत आहेत.

संबंधित व्हिडीओ