राज्यातील ठेकेदारांच्या बिलांचा प्रश्न सध्या चर्चेत आहे. अशातच कोल्हापूर महानगरपालिकेत एका ठेकेदारानं 85 लाख रुपयाचा घोटाळा केला.असा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्याकडून करण्यात आला.यानंतर महापालिकेकडून संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली.श्रीप्रसाद संजय वराळे असे या ठेकेदाराचे नाव आहे.या ठेकेदारान आता महापालिकेतीलच अधिकाऱ्यांनी टक्केवारीनुसार पैसे घेतल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल आहे.श्रीप्रसाद वराळे याच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी.